अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेताच अवघ्या २ महिन्यांत संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना एकाच व्यक्तीचे भय वाटू लागले आहे. त्यासाठी तालिबान्यांनी आता त्या व्यक्तीला संपवण्याचे पुढील लक्ष्य ठरवले आहे. त्याकरता त्यांनी पुन्हा एकदा युद्धाची तयारी सुरु केली आहे. तालिबान्यांची तशी रणनीती ठरलेली आहे.
पंजशीर खोऱ्याला तालिबान्यांचा वेढा!
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानातून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले. त्यामुळे अफगाण जनता अक्षरशः बेवारस पडली. अशा वेळी मात्र अफगाण भूमीतून तालिबान्यांच्या दहशतीला आव्हान देण्याची एकानेच हिंमत दाखवली, ती व्यक्ती होती अफगाणिस्तानचे उप राष्ट्राध्यक्ष अमृल्ला सालेह! त्यांनी तातडीने आपण अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष आहोत, असे घोषित करून अफगाण जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांना लागलीच १० हजार अफगाण सैन्यांनी पाठिंबा दिला. त्याआधारे अमृल्ला सालेह यांनी दक्षिण काबूल येथील पंजशीर खोऱ्यातील चारीकर जिल्हा ताब्यात घेतला. दोन दिवसांपूर्वी तालिबान्यांनी पंजशीर खोरे ताब्यात घेण्यासाठी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र अमृल्ला सालेह यांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे भेदरलेल्या तालिबान्यांनी आता अमृल्ला सालेह यांचा पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी तालिबान्यांनी त्यांची कुमक पंजशीर खोऱ्याकडे वळवली आहे. त्यांनी खोऱ्याला विळखा घातला आहे, तशी माहिती स्वतः अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष अमृल्ला सालेह अमृल्ला सालेह यांनी ट्विटद्वारे दिली.
Talibs have massed forces near the entrance of Panjshir a day after they got trapped in ambush zones of neighboring Andarab valley & hardly went out in one piece. Meanwhile Salang highway is closed by the forces of the Resistance. "There are terrains to be avoided". See you.
— Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) August 22, 2021
जी-७ देशांची बैठक
तालिबान्यांनी अमृल्ला सालेह यांना शरण येण्यास सांगितले होते, मात्र अमृल्ला सालेह यांनी त्याला नकार देत आपली तालिबानी दहशतवाद्यांशी चार-हात करायची तयारी आहे, अफगाण जनतेने त्यासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अमृल्ला सालेह यांनी केले होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ‘तालिबानी ज्या प्रकारे हैदोस घालत आहेत त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आमचे तालिबान्यांच्या कृत्यांवर बारीक लक्ष आहे, असे म्हटले आहे. तर जी-७ देशांनीही अफगाणिस्तानावरील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.
Join Our WhatsApp Community