उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्यांसाठी आणि राजकीय विधानांसाठी ओळखल्या जातात. अतिशय धाडसी विधाने त्या करत असतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. यावर त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांचं उत्तर असतं की, त्यांना या सर्व गोष्टीची गंमत वाटते, त्या दुर्लक्ष करतात. त्यामुळे ट्रोल करणार्यांनाही फारसा आनंद होत नसावा.
’बस बाई बस’ हा कार्यक्रमात केले वक्तव्य
अभिनेते सुबोध भावे यांनी नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले होते. त्यावर त्यांनी जनतेची माफी देखील मागितली आहे. सध्या सुबोध भावे यांचा झी मराठीवरील ’बस बाई बस’ हा कार्यक्रम खूप गाजतोय. पहिल्याच एपिसोडला त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आमंत्रित केलं होतं, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरुन देखील त्यांच्यावर टीका झाली होती. आता अमृता फडणवीस यांच्यासोबतचा त्यांना एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. या कार्यक्रमात अमृता फडणवीसांना अडचणीत पाडणारे प्रश्न विचारले गेले, पण त्यांच्या नेहमीच्या गंमतीशीर स्वभावामुळे त्यांनी या प्रश्नांची दिलखुलास पद्धतीने उत्तरं दिली. या कार्यक्रमाचा एक भाग असा असतो, ज्यात एक गाणं वाजवलं जातं आणि ते गाणं ऐकल्यावर कुणाची आठवण येते हे सांगायचं असतं.
(हेही वाचा आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghCaddha ट्विटर ट्रेंड?)
ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलं
आता सुबोध भावेंच्या या बस बाई बस या कार्यक्रमात ’कशी नशीबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं वाजवण्यात आलं होतं. त्यावर अमृता फडणवीस यांनी जे उत्तर दिलं, ते ऐकून भावेंनी मनातून ’बस बाई बस’ नक्कीच म्हटलं असणार. हे गाणं ऐकल्यावर त्यांच्यासमोर एकच चेहरा उभा राहिला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा. अमृता फडणवीस यांना करणारे ट्रोलर्स एकीकडे आणि अमृता फडणवीस करतात तो ट्रोल एकीकडे. त्यांनी ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलं आहे. यामुळे ठाकरे नक्कीच दुखावले गेले असतील. २०१९ साली युती झाल्यानंतर सौ. ठाकरे- सौ. फडणवीस यांच्या मैत्रिची चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धारेवर धरलं होतं. पण निवडणूक झाल्यानंतर ठाकरेंना बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि त्यांनी फडणवीसांना धोका दिला. यानंतर सौ. फडणवीसांनी बर्याचदा ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. सोशल मीडियावर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अमृता फडणवीसांना ट्रोल केलं होतं. आता डाव उलटला आहे, ठाकरेंची सत्ता गेली आहे. नशीबाने दिलेलं, कर्माने नेलं अशी गत झाली आहे आणि अशात अमृत फडणवीसांनी पुन्हा ठाकरेंवर निशाणा साधून त्यांना डिवचलं आहे.
Join Our WhatsApp Community