Y+ सुरक्षेनंतर अमृता फडणवीसांची मुंबई पोलिसांना विनंती, म्हणाल्या…

154

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अमृता फडणवीसांनी ट्वीट करून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांनी टॅग करून त्यांनी या दोघांना मला पायलट व्हेईकल देऊ नका, असे सांगितले आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस

“मला मुंबईच्या सामान्य नागरिकांप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे की, मला ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन देऊ नका. मुंबईतील रहदारीची स्थिती निराशाजनक आहे, पण मला खात्री आहे, हे सरकार लवकरच यावर उपाय काढेल, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

(हेही वाचा -मुंबई पोलिसांकडून सलमान खानला Y+ सुरक्षा, काय आहे प्रकरण?)

दरम्यान, अमृता फडणवीसांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची सुविधा देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला होता. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन प्रवास करताना पायलट वाहन म्हणून काम करते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.