‘ते एकमेव आहेत ज्यांनी…’, राज्यपालांच्या विधानावर मिसेस फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता मिसेस फडणवीस यांनी देखील राज्यपालांच्या विधानावरुन प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल मराठी माणसावर प्रेम करणारे

मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओळखते. मला वाटतं ते महाराष्ट्राचे एकमेव असे राज्यपाल आहेत जे इथे आल्यानंतर महाराष्ट्रात शिकले. त्यांचं मराठी भाषेवर खूप प्रेम आहेत. आपल्या मराठी माणसावर देखील त्यांचं खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा कायम चुकीचा अर्थ काढला जातो, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

(हेही वाचाः ‘सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही’, फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले)

फडणवीसांनीही केले होते विधान

जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे,देशाचे आणि आपल्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहतील, याबाबत कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण राज्यापालांच्या मनातही महाराजांबाबत कोणतेही चुकीचे भाव नाहीत, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here