आज ‘महाराष्ट्र बंद’… मग वसुलीचं काय?

त्यांनी एक हटके ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

169

अमृता फडणवीस… माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिनी. त्या जरी राजकारणात सक्रीय नसल्या तरी राजकीय नेत्यांवर टीका करताना त्या कधीही मागे राहत नाहीत. महाविकास आघाडी सरकामधील पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर सरकारवर सर्वच स्तरांतून टीका होत असताना अमृता फडणवीस कशा मागे राहणार. त्यांनीही एक हटके ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वसुलीचे आरोप करण्यात येत आहेत. त्याचाच संदर्भ घेऊन अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. आज वसुली चालू आहे का बंद? याची माहिती मला कोणी देईल का, असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे.

(हेही वाचाः बंदच्या नावाखाली सरकारपुरस्कृत दहशतवाद! फडणवीसांचा हल्लाबोल)

देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

लखीमपूर खेरी येथील घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्याविरोधात भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकारच बंद सरकार असल्याचा घणाघात सरकारवर केला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, राज्यात 2 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. त्यांना ना कर्जमाफीचा लाभ, ना कोणती मदत. अशात त्यांना मदत द्यायचे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे, असा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.

रुपाली चाकणकरांचं प्रत्त्युत्तर?

महाराष्ट्र बंदचा निषेध करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत सरकारला खोचक टोमणा हाणला होता. त्यालाच रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.