मिसेस फडणवीसांचा ‘वजनदार’ शब्दांत मुख्यमंत्र्यावर निशाणा! म्हणाल्या…

85

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगताना दिसत आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून टीका केली. फडणवीसांनी रविवारी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या आरोप-प्रत्यारोपाच्या वादात आता मिसेस मुख्यमंत्री अर्थात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतल्याचे दिसतेय. त्यांनी सोमवारी वजनदार शब्दात ट्वीट करून मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

काय म्हटले ट्विटमध्ये?

वज़नदार ने हल्के को,

बस हल्के से ही वज़न से,

कल ‘हल्का’ कर दिया …

(हेही वाचा – संपानंतर दीड महिन्यातच ‘लालपरी’ची ५२१ कोटींची कमाई!)

काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून फडणवीसांवर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी घेतलेल्या सभेत बाबरी पाडण्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून मुख्यमंत्र्यांनी चांगलाच हल्लाबोल चढविला आहे. प्रत्येकजण अयोध्येला निघाला आहे. बाबरी मी पाडली म्हणतात. पण, देवेंद्रजी तुम्ही बाबरीवर पाय जरी ठेवला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, अशी खोचक टीका ठाकरेंनी फडणवीसांना केली होती.

फडणवीसांनी दिलं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना फडणवीस मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते, की बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती. पण, त्यांना सांगायचे आहे की, आज माझे वजन १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो, त्यावेळी माझे वजन १२८ किलो होते. त्यात लाजण्यासारखे काय आहे? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसांची भाषा कळत नाही. त्यांना एफएसआयची भाषा कळते, असे म्हणत त्यांनी करारा जबाब दिल्याचे पाहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.