राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी मुख्यमंत्री यांच्या पत्नीवर पातळी सोडून खालच्या भाषेत टीका केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या वेळी केले वक्तव्य
या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा दुर्गा डोक यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले जात होते, त्यावेळी अशोक गावडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे, या प्रकरणी गावडे यांच्यावर भादंस कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला होता. या विषयात भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा कार्यकर्ते आक्रमक असल्याने ही कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांविरुद्ध ‘या’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!)
Join Our WhatsApp Community