‘आओ कुछ तुफानी करते है…’, अमृता फडणवीसांचा सूचक इशारा

78
राजकीय विषयावर सडेतोड भाष्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या नव्या वादात सापडल्या आहेत. त्यांना एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टार्गेट केले होते. ड्रग्स पेडलर सोबतचा त्यांचा फोटो सोशल मीडियात टाकून त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले. यामुळे अमृता फडणवीस यांनी या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला, माझ्या वाट्याला याला तर बघून घेईन, असे त्या म्हणाल्या होत्या. आता त्यांनी ‘आओ कुछ तुफानी करते है, मी पुन्हा येतेय’, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता अमृता फडणवीस काय बोलणार, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी “काहीतरी तुफानी करुयात, मी पुन्हा येत आहे” असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट अनेकांनी रिट्विट केले आहे. यावर नेहमीप्रमाणे अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

अमृता फडणवीस ट्विटमध्ये म्हणाल्या, “आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम…. मी पुन्हा येत अहे !!!” त्यांच्या या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या प्रसिद्ध वाक्यावरुन एकाने त्यांना टोला लगावला आहे. त्याने म्हटले की, “ते पंत येणार होते मागच्या दोन वर्षांपासून ‘मी पुन्हा येईन’ त्यांना आधी येऊ द्या”
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.