सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, १२ हजार ५०० रुपये अग्रीम देण्यास मान्यता

152

राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० इतकी रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे.

(हेही वाचा – फाटकी अन् मळकी जीन्स तब्बल १४२ वर्षांनी विकली, किंमत ऐकून व्हाल थक्क! ‘या’ जीन्समध्ये आहे तरी काय?)

उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून, १० समान हप्त्यांत परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे.

राज्य सरकारला अप्रत्यक्ष फायदा

राज्य सरकारकडून अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अग्रीम रकमेचा वापर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयामार्फत देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.