Raloa : रालोआ प्रवक्त्यांची फौज ‘इंडिया’ला चोख प्रत्यूत्तर देणार

भाजपकडून कार्यशाळेचे आयोजन, २८ पक्षांच्या ८५ नेत्यांनी घेतला भाग

176
Raloa : रालोआ प्रवक्त्यांची फौज 'इंडिया'ला चोख प्रत्यूत्तर देणार

विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीच्या भ्रामक प्रचाराला चोख आणि एकसमान प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अभेद्य योजना आखली आहे. विरोधी पक्षांच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी भाजपने शु्क्रवारी रालोआतील घटक पक्षांच्या प्रवक्त्यांना प्रशिक्षित केले आहे.

भारतीय जनता पक्षाने आज संसदेच्या अनेक्सीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २६ पक्षांच्या ८५ प्रवक्त्यांसाठी एका खास कार्यशाळेचे आयोजन केले होते. कॉंग्रेससह देशभरातील २८ पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी एकजूट झाले आहेत.
‘इंडिया’ नावाच्या विरोधी पक्षांच्या एकजुटीला रालोआतील घटक पक्षांच्या एकजुटीनेच प्रत्यूत्तर द्यायचे अशी योजना भाजपने आखली आहे. याचाच एक भाग म्हणून रालोआतील २८ पक्षांच्या ८५ प्रवक्त्यांसाठी भाजपने कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी यात भाग घेतला. ही कार्यशाळा सकाळी ११ पासून ते सहा वाजेपर्यंत चालली. विरोधी पक्ष हल्ले करतील तेव्हा त्यांना प्रत्यूत्तर देताना रालोआच्या प्रवक्त्यांची मते वेगवेगळी दिसून येऊ नये. शिवाय, काय बोलायचे आहे? कशावर बोलायचे आहे? कशा पध्दतीने बोलायचे आहे? अशा विविध विषयांची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Flag Hosting : शिंदे-फडणवीसांवर अजितदादा ‘भारी’; ध्वजारोहणासाठी काढलेले परिपत्रक बदलण्याची वेळ)

पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणे आहे. तत्पूर्वी, राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. शिवाय, विरोधी पक्षांचे नेते एकजूट आणि आक्रामक झाले आहेत. त्यांच्या हल्ल्याला योग्य पध्दतीने उत्तर देण्यासाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडतील प्रवक्त्यांची फौज तयार केली आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.