धक्कदायक! सोनू निघाला २० कोटींचा करचोर? 

एफसीआरए नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण लवकरच सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे.

84

मागील चार दिवसांपासून सोनू सूद सध्या चर्चेत आहे. आयकर विभागाकडून त्याच्याकडील संपत्तीचा दिवस-रात्र हिशेब तपासाला जात आहे. कालपर्यंत यामुळे मोदी सरकारला टार्गेट केले जात होते. मात्र आता वस्तुस्थिती निराळीच समोर आली आहे. सोनी सूदने चक्क २० कोटींपेक्षा अधिक रकमेची करचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोनू सूदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रकरण सीबीआयकडे जाणार!

आयकर विभाग सोनू सूदची चार दिवसांपासून चौकशी करत आहे. त्याच्या घरी सलग १६-१७ तास सर्वेक्षण करत आहे. ही कारवाई मोदी सरकार आकसापोटी करत आहे, असा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला. राजकीय पक्षही या आरोपावरून मोदी सरकारला टार्गेट करू लागले. सोनू दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या एका योजनेचा ब्रँड अँबेसिडर बनल्यामुळे त्याच्यावर आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोप होऊ लागला. विशेष म्हणजे सोनूने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बरीच समाजसेवा केल्यामुळे या आरोपांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अशा सर्व परिस्थितीत आता आयकर विभागाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सोनूकडून २० कोटींपेक्षा जास्तच्या करचोरीमध्ये सहभाग आहे. आयकर विभागाने आरोप केला आहे की अभिनेता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनने देशाबाहेरील देणगीदारांकडून २.१ कोटी गोळा केले आहेत. यात एफसीआरए नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण लवकरच सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, एफसीआरएच्या १ कोटीपेक्षा जास्त उल्लंघनाची चौकशी सीबीआयकडून केली जाते.

(हेही वाचा : आधी सोनूवर टीका, आता पाठिंबा! शिवसेनेची दुहेरी भूमिका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.