एनआयएच्या पथकाने वाझेला घेऊन घटनास्थळाची केली पहाणी

मनसुख हिरेन याचा मृतदेह मिळून आला. त्या ठिकाणी एनआयएच्या पथकाने पाहणी करून सचिन वाझेला काही प्रश्न विचारले, त्यानंतर हे पथक घटनास्थळपासून ४०० मीटर अंतरावर वाझेला घेऊन आले, तेथे त्याच्याकडे चौकशी करण्यात आली.

मनसुख हिरेन हत्येचा तपास एनआयएच्या हाती येताच मनसुखच्या हत्येच्या तपासाला गती आली आहे. एनआयएचे पथक गुरुवारी रात्री वाझेला घेऊन मनसुख याचा मृतदेह मिळून आला, त्या ठिकाणी आणि आदल्या दिवशी मारेकऱ्याची आणि मनसुखची भेट झाली, त्या ठिकाणी दाखल झाले होते. मुंब्रा रेतीबंदर ते घोडबंदर रोड दरम्यान तीन ठिकाणी वाझेला घेऊन एनआयएचे पथक फिरत होते.

सचिन वाझेला न्यायालयातून थेट ठाणे येथील मुंब्रा रेतीबंदर घेऊन आले  

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसने पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर या दोघांचा ताबा बुधवारी एनआयएकडे सोपवण्यात आला होता. एनआयएने मनसुख हत्येच्या तपासाला सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी एनआयएचे पथक सचिन वाझे याला न्यायालयातून थेट ठाणे येथील मुंब्रा रेतीबंदर घेऊन आले होते. मनसुख हिरेन याचा मृतदेह मिळून आला. त्या ठिकाणी एनआयएच्या पथकाने पाहणी करून सचिन वाझेला काही प्रश्न विचारले, त्यानंतर हे पथक घटनास्थळपासून ४०० मीटर अंतरावर वाझेला घेऊन आले, तेथे त्याच्याकडे चौकशी करण्यात आली.

(हेही वाचा : रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारची तयारी सुरू!)

तेथून पुढे हे पथक ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटी येथे दाखल झाले होते. या ठिकाणी मनसुखचा मृतदेह मिळण्याच्या आदल्या दिवशी रात्री मनसुख आणि विनायक शिंदे यांची भेट झाली. त्या ठिकाणी सचिन वाझे देखील मनसुखला भेटला होता. असा संशय एनआयएला आहे. काही वेळाने एनआयएचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here