दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट प्रथमच थेट आमने-सामने येणार आहेत. मुंबईत दोन्ही गटाचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. कारण शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र या उत्साहाला एका घटनेने गालबोट लागला आहे.
(हेही वाचा – भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले; एक पायलट शहीद, दुसरा गंभीर)
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील शिवसैनिक श्रीकृष्ण मांजरे यांचे दसरा मेळाव्याला जाताना वाटेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या या कार्यकर्त्याचे यवतमाळ ते मुंबई या प्रवासादरम्यान निधन झाले आहे.
वयवर्ष ६० असणारे श्रीकृष्ण मांजरे हे येथील निष्ठावंत शिवसैनिक होते. संजय राठोड यांच्या वतीने ते दसरा मेळाव्यात सहभागी झाले होते. आज प्रवासात अल्पोपहार करण्यासाठी भिवंडी येथे उतरले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पोस्टमार्टम झाले असून अंत्यसंस्कार हरसूल येथेच होणार असल्याची माहिती त्यांचा मोठा मुलगा मांजरे यांनी दिली आहे. मंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. शिवसेनेचा भगवा शेला नेहमी त्यांच्या खांद्यावर असायचा. शेती, शेत मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे. त्यांच्या मागे त्याची पत्नी, ३ मिले आणि एक विवाहित मुलगी, नातवंड सुना असा मोठा परिवार आहे.
Join Our WhatsApp Community