शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचे समन्स बजावले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी खेळी करत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना शिंदेंचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बनवले. हा सारा नियुक्त्यांचा खेळ सुरू असतानाच, केदार दिघे यांना एक धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात बलात्कार पीडित तरूणीला धमकावल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकऱणी मुंबई पोलिसांनी केदार दिघेंना समन्स बजावले असून ते चौकशीसाठी कधी उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
काय आहे प्रकरण
एका बलात्कार पीडित तरूणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना. म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रोहित कपूर याच्यावर बलात्काराचा गुन्हा ना. म. जोशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. लोअर परेल मधील सेंट रेगीज या पंचतारांकित हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
(हेही वाचा – Dahi Handi 2022 : गोविंदांसाठी ‘मनसे’चं चिलखत, तर ‘भाजप’चं सुरक्षा कवच!)
त्यानंतर पिडीत तरूणीने तक्रार नोंदवू नये म्हणून तिला केदार दिघेंनी धमकावल्याचा आरोप कऱण्यात आला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तरूणीवर बलात्कार करणारा रोहित कपूर आणि तिला धमकावणारा म्हणून केदार दिघे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील मुख्य आरोपी रोहित कपूर हा केदार दिघे यांचा मित्र असून त्याने २५ जुलैला लोअर परेल मधील सेंट रेगीज या पंचतारांकित हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश बहाण्याने त्याने तरूणीला हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि बलात्कार केला. याबाबत कुठेही न बोलण्याकरता तिले पैसे देण्यात आले मात्र तिने नकार दिला. त्यामुळे दिघेंनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरूणीने गुन्हा दाखल केल्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.