Sanjay Raut यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये ‘बेड’ बुक करु; Anand Paranjape यांची सडकून टीका

52
Sanjay Raut यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु; Anand Paranjape यांची सडकून टीका
  • प्रतिनिधी 

“भांडूपचा भोंगा” म्हणून अप्रत्यक्ष उल्लेख करत शिवसेना उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सडकून टीका केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करताना भान न राखल्यास, “भविष्यात ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड बुक करू,” असा इशारा परांजपे यांनी दिला.

गुरुवारी संसदेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भाष्य करत शिवसेनेच्या मूळ हिंदुत्वाचा उल्लेख केला होता. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ या घोषणेला उजाळा दिला आणि ९२-९३ मधील घटनांची आठवण करून दिली. यामुळे संजय राऊत अस्वस्थ झाले असून त्यांनी दिल्लीहून कर्कश आणि असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्याचा आरोप परांजपे यांनी केला.

(हेही वाचा – Indian Railway : अमेरिका, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारतीय रेल्वेचा नवा रेकॉर्ड!)

“बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आणि आताची संजय राऊत (Sanjay Raut) यांची शिवसेना उबाठा यात जमीनअस्मानाचा फरक आहे,” असे सांगत परांजपे यांनी शिवसेना उबाठावर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की, “जे शब्द राऊत वापरतात, तेच जर आम्ही वापरले, तर आम्हालाही संजय राऊत यांना ‘कॉंग्रेसचे सर्टिफाईड…’ किंवा ‘सिल्व्हर ओकचे सर्टिफाईड…’ असे म्हणता येईल. पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत.”

राज्यसभा आणि लोकसभेतील शिवसेनेच्या वागणुकीवर निशाणा साधताना परांजपे म्हणाले की, “शिवसेना उबाठा सध्या गोंधळलेल्या मानसिकतेतून बोलत आहे. पक्षातून सातत्याने लोक बाहेर पडत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास ढासळत आहे. याचा विचार राऊत यांनी करायला हवा.”

(हेही वाचा – Waqf amendment bill मंजूर झाल्यानंतर रझा अकादमीने थेट सरकारलाच दिली धमकी)

पत्राचाळ घोटाळ्याचा संदर्भ देत परांजपे म्हणाले की, “संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी आठ ते नऊ महिने ईडीच्या कोठडीत घालवले आहेत. सध्या ते जामिनावर आहेत. त्यांच्या आरोपांना गांभीर्य नाही. उलट प्रफुल्ल पटेल यांच्यावर कोणतीही चौकशीसुद्धा लागलेली नाही.” संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकारण अधिक चिघळण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.