महायुतीत उत्तम समन्वय; माध्यमांतील ‘सूत्रधारां’वर Anand Paranjape यांची कोपरखळी

62
महायुतीत उत्तम समन्वय; माध्यमांतील ‘सूत्रधारां’वर Anand Paranjape यांची कोपरखळी
  • प्रतिनिधी

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात उत्तम समन्वयाने कार्य सुरू असल्याचे सांगत, माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या उलटसुलट चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी जोरदार टीका केली. “महायुतीत सर्व काही आलबेल आहे, पण माध्यमांमध्ये ‘सूत्र’ नावाचे सूत्रधार सक्रिय आहेत,” अशी कोपरखळी त्यांनी लगावली.

(हेही वाचा – Dr. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल रोजी टूर सर्कीटचे आयोजन; शंभूराज देसाई यांची माहिती)

रायगड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात कोणताही राजकीय हेतू नव्हता, हे परांजपे (Anand Paranjape) यांनी ठामपणे स्पष्ट केले. “शहा हे राजकीय कार्यक्रमासाठी नव्हे, तर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडला आले होते. माध्यमांनी रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा पसरवली, पण अशा चर्चांना वास्तवात काहीही आधार नाही,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीदेखील याची पुष्टी केली. परांजपे (Anand Paranjape) यांनी अमित शहा यांच्याकडे राजकीय परिपक्वता असल्याचे सांगत, तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना शहा यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिल्याचे नमूद केले.

(हेही वाचा – Dead Body : शवागृहातील ७५ बेवारस मृत आत्म्यांना मिळणार मुक्ती; कशी वाचा)

याशिवाय, परांजपे (Anand Paranjape) यांनी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर कुटुंबावर होणारी टीका क्लेशदायक असल्याचे म्हटले. “मंगेशकर कुटुंबाचे संगीत क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी जबाबदार डॉक्टरांवर कारवाई होईल, पण कुटुंबाला लक्ष्य करणे चुकीचे आहे,” असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय आणि माध्यमांच्या चर्चांना परांजपे यांनी दिलेले चोख प्रत्युत्तर यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांनी पसरवलेल्या अफवांना पूर्णविराम देत परांजपे (Anand Paranjape) यांनी महायुतीची एकजूट अधोरेखित केली. येत्या काळात या मुद्द्यांवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.