-
प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी अंजली दमानिया यांना मिळालेल्या गुप्त कागदपत्रांच्या सत्यतेबाबत पोलिस चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी सांगितले की, सनसनाटी आरोप करण्याचा अधिकार लोकशाहीत आहे, मात्र जबाबदार मंत्र्यांवर खोटी कागदपत्रे तयार करून २०० कोटींच्या व्यवहाराला मान्यता दिल्याचा आरोप चुकीचा आहे.
(हेही वाचा – Ranveer Allahbadia च्या वादग्रत विधानानंतर केंद्र सरकारने OTT Platform ला फटकारले)
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी १९९५ मधील फेरफार प्रकरणात आलेल्या निकालाविरोधात गुरुवारीच मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, खालच्या न्यायालयाच्या निकालाविरोधात स्थगिती मिळेल, असा विश्वास परांजपे (Anand Paranjpe) यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री Udayanidhi यांचा उर्मटपणा; म्हणाले, मोदीजी…)
याशिवाय, पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे प्रस्तावित बंदर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. तसेच, महाकुंभ हा हिंदू धर्मीयांच्या आस्थेचा विषय असल्याने त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे, असेही परांजपे (Anand Paranjpe) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community