केसरकर म्हणतात, दिवाळी तुळशी विवाहापर्यंत, तोवर आनंदाचा शिधा पोहचेल!

154

दिवाळीत १०० रुपयांमध्ये ४ जिन्नस असलेला आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहचवण्यात येईल, अशी घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती, मात्र प्रत्यक्ष दिवाळी सुरु झाली तरी हा शिधा बहुतेक लोकांपर्यंत पोहचला नाही, त्यामुळे या प्रकरणी टीका सुरु झाली आहे. अशा वेळी मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र याविषयी बोलताना आपल्याकडे तुळशी विवाहापर्यंत दिवाळी सुरु असते, तोपर्यंत सर्वत्र आनंदाचा शिधा पोहचवण्यात येईल, असे म्हटले.

सरकारबाबत नाराजी 

शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर ‘आनंदाचा शिधा’ या योजनेचा मोठा गाजावाजा केला होता. या योजनेतंर्गत रेशन कार्डधारकांना फक्त १०० रुपयांमध्ये रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता दिवाळीचे दोन दिवस उलटले असले तरी फराळासाठी आवश्यक असणारा हा आनंदाचा शिधा अनेक रेशनिंग दुकानांमध्ये पोहोचलेलाच नाही. प्रत्येक सण दणक्यात साजरा करायचा असा चंग बांधलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजनेसंदर्भात केलेली घोषणा लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे रेशनिंगच्या साहित्यावर अवलंबून असणारी राज्यातील अनेक कुटुंबं ‘आनंदाचा शिधा’ कधी मिळणार याकडे डोळे लावून बसली होती. परंतु, दिवाळी सुरु होऊनही अद्याप अनेक रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यामुळे लोकांना खुल्या बाजारातून चढ्या दराने फराळासाठीचे पदार्थ घ्यावे लागले. राज्यात काही ठिकाणी याचा काळाबाजार ही सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणा आणि फोलपणा उघड झाला होता. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना संताप व्यक्त केला होता.

(हेही वाचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाला मंत्रिपद मिळणार?; मुख्यमंत्री म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.