Fadnavis यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? अनंत गाडगीळ यांचा सवाल

23
Fadnavis यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? अनंत गाडगीळ यांचा सवाल
  • खास प्रतिनिधी 

“ना खाउंगा ना खाने दूंगा’ अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना पकडण्याची बातमी ऐकताच फडणवीस (Fadnavis) यांनी ‘लाडका विनोद’ अशी काही योजना सुरू केली आहे का? असा खोचक सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केला आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024: मतदानासाठी पोलीस सज्ज! मुंबईत ३२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात)

मतदानाचा अधिकार काढा

“१९८७ साली दिवंगत बाळासाहेब ठाकरे व रमेश प्रभू यांना धर्मावर आधारित निवडणूक प्रचार केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षाकरीता काढून घेतला होता. तसा विनोद तावडे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेत निवडणूक आयोग निष्पक्ष असल्याचे दाखवून देणार की हे प्रकरणही वॉशिंग मशीनमधे घालून तावडे यांना क्लिनचिट देणार?” असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. (Fadnavis)

(हेही वाचा – Mahim Assembly Fight : शेलारांच्या भूमिकेशी स्थानिक भाजपा नेते सहमत)

‘चिक्की ते नाचक्की’

“दिवंगत अटल बिहारी वाजपेयी, श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांची परंपरा असलेल्या भाजपाला सध्याच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ‘चिक्की पासून नाचक्की’ ची सुरुवात करत कुठे नेऊन ठेवला आहे हा भाजपा? असे आता त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत,” असे गाडगीळ म्हणाले. (Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.