अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक: भाजपच्या मुरजी पटेलची उमेदवारी यादव यांना मान्य

142

अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये भाजपचे दिवंगत माजी नगरसेवक सुनील यादव आणि विद्यमान भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यातील वैर जगजाहीर असून पक्षाने मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत माजी नगरसेविका संध्या यादव यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे पटेल अणि यादव यांच्यातील राजकीय वैर आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर केशरबेन पटेल निवडून आले

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाकरता शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे, लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतल्या असून भाजपच्यावतीने मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढणाऱ्या मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका या काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसच्या तिकिटावर केशरबेन पटेल निवडून आल्या होत्या. परंतु सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. तेव्हापासून या भागातील भाजपचे पदाधिकारी असलेले माजी नगरसेवक सुनील यादव यांच्याशी त्यांचे राजकीय वैर होते.

(हेही वाचा शिंदेंच्या ‘उठावा’ला मिळाली ‘ढाल-तलवारी’ची साथ)

यादव कुटुंब कोंडीत सापडले

पटेल आणि सुनील यादव यांचे राजकीय वैर सर्वश्रृत होते. मुरजी पटेल हे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असल्याने हे राजकीय वैर होते. परंतु काही महिन्यांपूर्वी सुनील यादव यांचे निधन झाले. परंतु पतीच्या पश्चात माजी नगरसेविका संध्या यादव यांनी पुन्हा एकदा पक्षात सक्रीय होत पक्षाची विभागातील धुरा सांभाळली. पण संध्या यादव यांनी पक्षाचा आदेश मानत मुरजी पटेल यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. संध्या यादव यांनी आपल्या फेसबूक पोस्टवर मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पक्षाचा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्या विभागात मेहनत करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांसह सरसावल्याचे पहायला मिळत आहे. यापूर्वी शिवसेना भाजपची युती असताना अंधेरी पूर्वमधील प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला जात असताना सुनील यादव यांनी संध्या यादव यांना शिवसेनेत पाठवून त्यांना निवडून आणले होते. त्यामुळे सन २०१२ ते २०१७ या कालावधीत शिवसेनेच्या नगरसेविका होत्या आणि सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभेत सुनील यादव यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे बायको शिवसेनेची नगरसेविका आणि नवरा भाजपचा उमेदवार अशाप्रकारच्या कोंडीत यादव कुटुंब होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.