अंधेरी येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर त्या जागी पोटनिवडणूक अशा वेळी जाहीर झाली आहे, ज्या वेळी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा विषय प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत आणि निवडणूक आयोग यावर निर्णय घेण्यासाठी किमान अडीच-तीन महिने यावर निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या पोट निवडणुकीत भाजपचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढेल, पण उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना मात्र धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हे पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गटाला वेगळ्याच चिन्हावर लढावी लागेल, अशी शक्यता आहे.
म्हणून भाजपचा उमेदवार उभा राहणार
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीने आपला उमेदवार निश्चित केला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता असल्याने त्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी भाजप-शिवसेना शिंदे गटाने केली. सध्या जसे उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळणे खात्रीचे नाही, तसेच शिंदे गटालाही ते चिन्ह मिळेलच यांची शाश्वती नाही. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा उमेदवार दिला तर तो पक्षाच्या चिन्हावर उभा राहून उद्धव ठाकरे गटाला मात देईल, या विचाराने भाजप-शिवसेना शिंदे गटाने भाजपचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. भाजपाने य जागेसाठी माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे गटाची विधानसभा स्तरावरची ही पहिली निवडणूक आहे.
(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)
Join Our WhatsApp Community