Andhra Pradesh Rain: पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा!

90
Andhra Pradesh Rain: पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा!
Andhra Pradesh Rain: पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा!

आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस (Andhra Pradesh Rain) सुरू असून अनेक नद्यांना पूर (Heavy Rain) आला आहे. त्यामुळे, नद्यांजवळील गावातील नागरिकांच स्थलांतर करण्यात आले आहे. येथील अनेक भागात ड्रोनद्वारे आणि सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून जेवण पोहोचवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ड्रोनद्वारे जेवण पोहोचविण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ड्रोनच्या मदतीने पूरग्रस्तांना अन्न पुरवलं जात आहे.

(हेही वाचा-Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!)

आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh Rain) पूरग्रस्त भागात अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा ड्रोनद्वारे (Drone) करण्यात आला आहे. या ड्रोनद्वारे जवळपास 8 ते 10 किलो वजनाचे साहित्य व पदार्थ पाठवण्यात यश आले आहे. त्यामध्ये, अन्न, पाणी आणि औषधांचा साठा आहे. त्यामुळे, पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील अधिकाऱ्यांनी या पदार्थांची पाठवणूक करण्यासाठी 15 पेक्षा जास्त ड्रोनची व्यवस्था केली आहे. आत्तापर्यंत 2 लाख 97 हजार 500 नागरिकांसाठी हे अन्न व पाणी पुरवठा करण्यात आला आहे. तसेच, येथील बेघर लोकांसाठी विजयवाडा शहरात पुनर्वसन शिबीरांचे आयोजन करण्यात आलं असून तिथे या सर्वांची सोय केली जात आहे.

(हेही वाचा-BoycottNetflix का होतंय ट्रेंड? ‘Netflix’ला केंद्र सरकारची नोटीस! काय आहे कारण?)

याबाबत मंत्री लोकेश यांनी माहिती देताना म्हटले की, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी व गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा करण्याची ही देशातील पहिलीच वेळ असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Andhra Pradesh Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.