राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अखेर राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन आणि पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे.
( हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अखेर तोडगा! मुख्यमंत्र्यांनी पगाराबाबत केली मोठी घोषणा )
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणे, नवीन मोबाइल उपलब्ध करून देणे, पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती आणि सर्व अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. दरम्यान या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या संपात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच सेवा समाप्ती झाल्यावर पेन्शन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन तसेच सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होते त्यामुळे राज्य सरकारने चर्चेची भूमिका घेत या मागण्या मान्य केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community