अमरावती जिल्ह्याच्या राजपेठ परिसरातील एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पोलिस प्रशासनाला जाब विचारत त्यांना धारेवर घेतले. लव्ह जिहादच्या प्रकरणातून मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगत राणा यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. पण ही मुलगी समोर आल्यानंतर राणा यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनात राणा यांच्याविरोधात निदर्शने केली. यावेळी एका संतप्त पोलिस पत्नीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पोलिस तुम्हाला किराणा वाटून मोठे झाले नाहीत
नवनीत राणा या मागील अनेक दिवसांपासून पोलिसांवर आक्षेप घेत आहेत. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्या खासदार आहेत, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षासोबत तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही जर पोलिसांचा इतकाच राग करत असाल तर तुम्हाला असलेली पोलिस सुरक्षा तुम्ही काढून टाका. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोलिस संरक्षण घेऊन जाता, हे संरक्षण घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला संरक्षण देणारे पोलिस कर्मचारी हे शासनाचे आहेत, ते स्वतःच्या मेहनतीने आज पदावर पोहोचले आहेत. तुमच्या सारख्या लोकांना किराणा वाटून ते मोठे झाले नाहीत. पोलिसांनी बोलायची तुमची भाषा योग्य नाही.
(हेही वाचाः ‘त्यांना माझ्यामुळे पुण्य मिळतंय’, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे आणि विरोधकांना टोला)
तुमचा माज कमी करा
माझे पती स्वतः पोलिस आहेत, दिवसरात्र ड्युट्या करतात,सणासुदीच्या काळात देखील ते आमच्यासोबत नसतात आणि तुम्ही त्यांच्याबाबत अशी भाषा वापरता. त्यामुळे तुम्ही तुमचा माज आहे तो कमी करा. तुम्ही स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवता पण लोकप्रतिधींची भाषा ही प्रेमाची असते, अशा शब्दांत संतप्त पोलिस पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community