Abu Azmi यांच्या औरंगजेबाविषयीच्या विधानावरून नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची उपमुख्यमंत्र्यांची मागणी

50

मुंबई प्रतिनिधी:

समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाविषयी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. “औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही. त्यावेळी हिंदू-मुस्लिम लढाई (Hindu-Muslim battle) नव्हती, ती राज्यनिर्मितीसाठीची लढाई होती. औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते, तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते. औरंगजेबाच्या काळात भारत समृद्ध होता,” असे विधान त्यांनी केले. आझमी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Abu Azmi)

राजकीय नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया

अबू आझमी यांच्या विधानानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. अबू आझमी जर असे बोलत असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.”
  • शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) अपमान आहे. त्यांच्या विरोधात खटला भरला पाहिजे. मात्र, हे भाजपा सरकार असल्यामुळे कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न आहे.”
  • भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी अबू आझमींवर टीका करत म्हणाले, “अबू आझमींनी ‘छावा’ हा चित्रपट पाहावा आणि खरा इतिहास वाचावा. ज्याला ते महान समजत आहेत, त्याने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे ठार मारले. संभाजी महाराजांना त्याने अमानुष छळ करून तुरुंगात टाकले. अबू आझमींना या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे.”

(हेही वाचा – वाहनांच्या नंबर प्लेटमधील छेडछाड रोखण्यासाठी HSRP Number Plate अनिवार्य)

वाद आणखी चिघळण्याची शक्यता
अबू आझमी यांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपा आणि महायुतीतील नेते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांकडून (opposition party) देखील सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढवला जात आहे. याप्रकरणी सरकार कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.