राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर गुरुवारी, ११ मेला निकाल लागला आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत करता आली असती, असे विधान न्यायालयाने केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत ज्यांनी रणांगण सोडले त्याच्या मागे सर्वोच्च न्यायालयसुद्धा उभे राहू शकत नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
नक्की काय म्हणाले अनिल बोंडे?
“रणछोडदास बन गए तो कोई बचा नाही सकता” हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने दाखवून दिले आहे. तुम्ही युद्धाला सामोरे न जाता आधीच जर राजीनामा द्यायला पाठीमागे जाल तर तुम्हाला जनताही वाचवू शकत नाही आणि न्यायालयसुद्धा वाचवू शकत नाही. तुम्ही आधीपासूनच पराभव मान्य केला होता, अशी खोचक टीका अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. सरकारला कोणताही धोका नसून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. जी प्रगती आठ महिन्यांपासून सुरू होती. त्याला खीळ कोणी घालू शकणार नाही. राज्यपालांनी त्या परिस्थितीत राज्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. त्याचा विश्लेषण होणार आहे. त्यावेळेला राज्य अस्थिर होऊ नये यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असेल, असेही बोंडे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community