काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटायला नको तर जिभेला चटके द्यायला पाहिजे असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. ‘पप्पू टप्पू उडान टप्पू’ म्हणत बोंडे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
( हेही वाचा : राष्ट्रीय अजिंक्यपद Sport Climbing स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी मिळवले घवघवीत यश)
खासदार डॉ. अनिल बोंडे पत्नी डॉ. वसुधा बोंडे (Dr. Vasudha Bonde) यांच्यासोबत अंदमान निकोबार बेटाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या हिंदी राजभाषा समितीच्या निमित्याने त्यांचा हा दौरा होत आहे. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर तुरुंगातील काळकोठडीला भेट दिली. ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या कोठडीत जाऊन अनिल बोंडे यांनी सावरकरांचे (Swatantrya Veer Savarkar) स्मरण केले. त्या कोठडीत काही काळ ध्यानही केले. तसेच सावरकरांच्या पावन स्मृतीला आपण नमन करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Dr. Anil Bonde)
दहा वर्षापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांनी या कोठडीत वास्तव्य केले. जी माणसे वीर सावरकरांवर टीका करतात, त्यांनी या कोठडीत एकदा येऊन बधावे. सात दिवस राहून पाहावे. इथला कोल्हू चालवावा. तुरुंगातले कपडे घालावे त्यावेळी काँग्रेस आणि समस्त टीकाकारांना सावरकरांचे देशासाठी काय बलिदान होते, त्यांनी देशासाठी काय त्याग केला, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सोबतच सावरकरांचा त्याग अंदमानात येऊन अनुभवण्याचाही सल्ला डॉ. बोंडे यांनी दिला. असे असतानाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांना माफीवीर म्हणून हिनविणाऱ्या राहुल गांधी यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला. (Dr. Anil Bonde)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community