देशमुखांना अटक : नितेश राणे म्हणतात, अनिल परब ‘मेरी ख्रिसमस’!

आमदार नितेश राणे यांनी तर थेट पुढचा नंबर कुणाचा, असे सूचित करणारे ट्विट केले. 

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणात ईडीने सोमवारी, रात्री उशिरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी तर थेट पुढचा नंबर कुणाचा, असे सूचित करणारे ट्विट केले.

आता अनिल परब? 

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही प्रहार केला. ‘अनिल देशमुख.. हॅप्पी दिवाळी! अनिल परब.. मेरी ख्रिसमस?? नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे विशेष आभार’. अशा आशयाचे ट्विट करून राणे यांनी आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार असून ख्रिसमसपर्यंत त्यांनाही अटक होईल, असे राणे यांनी सूचित केले आहे.

पवार-ठाकरेंचे टेन्शन वाढले!

तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही ट्विट करून ठाकरे सरकारचा समाचार घेतला. ‘अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. १०० कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब’, अशी कॅप्शन देत सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आता या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टेन्शन वाढेल. त्यांनी असाही आरोप केला आहे की, दरमहा १०० कोटींची वसुली व्हायची त्यातील पवार यांच्याकडे किती आणि ठाकरे सरकारकडे किती पैसे जायचे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

(हेही वाचा : अखेर माजी गृहमंत्री देशमुखांना अटक! ५ समन्सला टाळले होते)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here