राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित वसुली प्रकरणाचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात यावा याकरिता जयश्री पाटील यांनी सीबीआयला तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला असता, या प्रकरणात पहिली अटक सीबीआयने केली होती. आता या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने घेतला आहे. आर्थर रोड कारागृहातून हा ताबा घेण्यात आला आहे. त्यांना बुधवारी सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काय आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
( हेही वाचा: एसटी कर्मचारी संभ्रमात! महामंडळ मूळ याचिकाच घेणार मागे? )
सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत
यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
Join Our WhatsApp Community