अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना ईडीने सोमवारी ईडी कार्यलायत हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते. असे असताना सुद्धा ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख हे दोघेही सोमवारी ईडी कार्यलयात हजर राहणार नसल्याचे, देशमुख यांनी वकिलामार्फत दोन पानी पत्र लिहून ईडीला कळवले आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई पासून दिलासा मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, त्यानंतर मी ईडीच्या चौकशीला स्वतःहून हजर होईन, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
याआधीही होते गैरहजर
याआधीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या २ खासगी सचिवांना ईडीने अटक केल्यानंतर, ईडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा समन्स बजावून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश 26 जून रोजी दिला होता. मात्र त्यावेळीही देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी ईडीला पत्र पाठवून देशमुख येणार नसल्याचे कळवले होते. ईडीने नोटीस पाठवताना सोबत कोणत्या केससाठी बोलावले आहे, हे कळवले नाही. त्याविषयी माहिती द्यावी, अशी मागणी त्यावेळी केली होती.
Join Our WhatsApp Community