१०० कोटींच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉंडरिंगप्रकरणी अटक केली होती. अखेर ११ महिन्यानंतर देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दसरा देशमुख घरी साजरा करतील, अशी शक्यता आहे. मात्र सीबीआयचाही देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेबाबत अद्याप साशंकता आहे.
मोठी बातमी : – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर, ११ महिन्यांनंतर येणार तुरूंगाबाहेर #AnilDeshmukh #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics @AnilDeshmukhNCP @PawarSpeaks @NCPspeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 4, 2022
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख हे महिन्याला १०० कोटींची वसुली करण्यास सांगत होते, असा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांच्यावर ईडीने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 1 लाखाच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ईडी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने आदेशावर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.