अनिल देशमुखांच्या लपंडावामागे काय आहे गौडबंगाल? वाचा… 

देशमुख यांनी अज्ञातवासातूनच स्वतःचे म्हणणे मांडलेला व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल केला आहे.

120

एका बाजूला ईडी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुंबई, नागपूर येथील घरांवर धाडी टाकते, देशमुखांना समन्स बजावते, तरीही देशमुख इकडून तिकडे गायब होत आहेत, ना ईडीच्या कार्यालयात जात, ना ईडीची छापेमारी असताना तिथे हजर होत, त्यामुळे देशमुखांचा हा लपंडाव अटकेपासून दूर पाळण्यासाठी सुरु आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा!

यावर देशमुख यांनी अज्ञातवासातूनच स्वतःचे म्हणणे मांडलेला व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला ईडीने समन्स पाठवला आहे. मात्र त्याविषयी आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिथे अजून निर्णय यायचा आहे. एकदा का न्यायालयाचा निर्णय आला कि, आपण ईडीच्या कार्यालयात नक्की जाणार आहे, असे देशमुख म्हणाले. त्याचबरोबर ईडीने आपली ४ कोटीची मालमत्ता जप्त केली, त्याची बाजारभाव किंमत ३५० कोटी असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र प्रत्यक्षात ती मालमत्ता २ कोटीची असून त्याची किंमत ३५० कोटी नाही, असा खुलासाही देशमुख यांनी केला.

(हेही वाचा : सरकारमध्ये मंत्री कमी बोलके पोपट जास्त! देवेंद्र फडणवीस यांची टीका)

या वयात लपाछपी शोभत नाही! – भाजप 

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख यांचे आता वय झाले आहे. या वयात त्यांना लपाछपीचा खेळ झेपेल, असे वाटत नाही, असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. तसे ट्विट त्यांनी केले आहे. रविवारी  ईडीची दोन पथके अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. वडविहिरा हे देशमुख यांचे मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. दरम्यान, येथे छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतले होते.अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती..

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.