राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती यांना समन्स जारी केले आहे, त्यांना गुरुवारी, १४ जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र आरती देशमुख आजारी असल्याचे अनिल देशमुख यांचे वकील ऍड. कमलेश घुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ईडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि पत्नी आरती यांना समन्स पाठवले असून अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांना अद्याप कुठल्याही प्रकारचे समन्स ईडीकडून आले नसल्याचे ऍड. घुमरे यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुखांच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही!
अनिल देशमुख यांचे वकील ऍड. कमलेश घुमरे यांनी बुधवारी दुपारी त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हि माहिती दिली. उच्च न्यायालयात सुरु असणाऱ्या प्रकरणाची सुनावणी संपली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असल्याचे सांगत आतापर्यंत देशमुख यांच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांमध्ये काय सत्यता आहे, हे सांगण्यासाठी मी आज आलो असल्याचे सांगत अनिल देशमुख यांच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत केवळ त्या ऐकीव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईडीच्या चौकशीत वाझेच्या नंबर १ यांना ४ कोटी ७० लाख दिल्याचे म्हटले आहे, मात्र हे नंबर १ देशमुख नसून परमबीर सिंग असल्याचे ऍड. घुमरे यांनी पत्रकारांशी बॊलताना सांगितले.
(हेही वाचा : दादरच्या कासारवाडी आणि प्रभादेवीतील सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास रखडणार)
१०० कोटी वसुलीचा आरोप खोटा!
सचिन वाझे याने न्या. चांदीवाल आयोगासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुठेही ४ कोटी ७० लाख रुपयाचा उल्लेख केला नाही, तसेच अनिल देशमुख यांना ते केवळ एकदाच जानेवारी महिन्यात भेटल्याचे म्हटले आहे. ईडीकडून घेण्यात येणाऱ्या वाझेच्या जबाबाच्या वेळी त्यांचे अधिकारी तिकडे हजर होते, मात्र आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मोकळ्या वातावरणात देण्यात आले असल्याचे देशमुख यांचे वकील ऍड. घुमरे यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेला १०० कोटी वसुलीचा आरोप खोटा असून देशमुख हे परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार होते, मात्र ते राहून गेले असल्याचे ऍड. घुमरे म्हणाले. सचिन वाझे याने एनआयए कोठडीत असताना लिहलेले पत्र न्यायालयाने मान्य केलेले नसून ऍड. पाटील यांनी केलेल्या याचिकेवर मी काही भाष्य करणार नसल्यचे ऍड. घुमरे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community