अनिल देशमुख यांनी उपकाराची जाणीव ठेवावी; Sunil Tatkare यांचा इशारा

शरद पवारांची भेट घेतली नसल्याचा खुलासा

159
मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा; Sunil Tatkare यांची मागणी

नाशिक दौऱ्यामध्ये माझी आणि शरद पवार यांची भेट झाल्याचा डांगोरा पिटवून माझी राजकीय बदनामी करणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपण केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शुक्रवारी दिला. नाशिक मुक्कामी आपण शरद पवार यांची भेट घेतली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. (Sunil Tatkare)

अनिल देशमुख यांनी आज नाशिकमध्ये बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी नाशिक मुक्कामी शरद पवार यांची भेट घेतल्याचा दावा केला. देशमुख यांच्या या दाव्यावर तटकरे यांनी आज संताप व्यक्त केला. शरद पवारांच्या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा हजर होते, असे बोलून देशमुख यांनी आमची खरोखरच भेट झाली असल्याचे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नाशिक दौऱ्यात माझी शरद पवार किंवा त्यांच्या कोणत्याही नेत्यांसोबत भेट झाली नाही, असे तटकरे म्हणाले. (Sunil Tatkare)

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. या चारही टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारीचा कुठेही आवाज घुमला नाही. आता पराभव दिसू लागल्यामुळे देशमुख संभ्रम निर्माण करत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनिल देशमुख हेसुद्धा आमच्या सोबत येणार होते. पण मंत्रिपद दिले नाही म्हणून ते शरद पवार यांच्या सोबतच राहिले. आता हेच देशमुख आपण पक्षनिष्ठ असल्याचा कांगावा करत आहेत, अशी टीका तटकरे यांनी केली. (Sunil Tatkare)

(हेही वाचा – Latur Water Shortage: लातूरकरांच्या घशाला कोरड; टंचाईग्रस्त गावांची संख्या ४०० पार)

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ तसेच नाशिक, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीला अनुकूल वातावरण आहे, असा दावाही त्यांनी केला. (Sunil Tatkare)

नाशिकमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून छगन भुजबळ नाराज असून ते महायुतीच्या प्रचारात सहभागी नाहीत, अशा वावड्या विरोधकांमधून उठवल्या जात आहेत.वास्तविक, भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित होते. कांदा निर्यातीचा प्रश्न मांडून त्यांनी मोदी यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या आहेत. इतकेच नाहीतर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारही करत आहेत, अशी माहिती तटकरे यांनी दिली. (Sunil Tatkare)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.