अनिल देशमुखांचा मुलगा कारवाई टाळण्यासाठी माझ्या पाया पडला होता; Parambir Singh यांचा दावा

366

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख केवळ मुंबईतूनच नव्हे तर राज्यातील विविध भागांतून आपल्या एजंट्सच्या माध्यमातून वसुली करत होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर देशमुखांचा मुलगा चूक झाल्याचे सांगत अक्षरशः माझ्या पाया पडत होता. मी तुमची माफी मागतो. अनिल देशमुखही तुमची माफी मागण्यास तयार आहेत. तुम्हाला राज्याच्या डीजीपदी बढती दिली जाईल असे अनेक प्रस्ताव त्यांनी माझ्यापुढे ठेवले. पण मी त्यांचे सर्वच प्रस्ताव फेटाळले, असे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

(हेही वाचा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर Bangladesh च्या PM Sheikh Hasina यांनी सोडला ढाका; हजारो आंदोलक पंतप्रधान निवासात घुसले)

धमक्यांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे

माझी आयपीएस म्हणून प्रतिमा अत्यंत स्वच्छ राहिली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या काळात केवळ मुंबईच नाही तर राज्यातील विविध भागांतून आपल्या एजंट्सच्या माध्यमातून वसुली करत होते. हे सर्वकाही सीबीआयच्या तपासाद्वारे स्पष्ट झाले आहे. मी त्यांच्यावर आरोप केल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मला धमकावले. त्या धमक्यांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. ते मी सुप्रीम कोर्ट व तपास संस्थांनाही उपलब्ध करून दिले. अनिल देशमुख यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली नाही, तर माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून मला फसवले जाईल, असे पांडे म्हणाले होते. पण त्यानंतरही मी घाबरलो नाही. मी तपासाला पूर्ण सहकार्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यालगत स्फोटके ठेवण्यात आली होती. माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना मनसुख हिरेन प्रकरणात अटक होणार होती. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर वसुलीचे आरोप केले, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेपुढे मांडण्याचीही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी उपरोक्त दावा केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.