दापोलीतील साई रिसॉर्टला कोर्टाचे संरक्षण आहे. त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही, असे म्हणत अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली आहे.
काय आहे प्रकरण
गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या आणि अनिल परब या वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले दापोलीतील साई रिसोर्ट मंगळवारी पाडणार असल्याची चर्चा होते. अनिल परब यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वात आधी केला होता. पर्यावरण विभागाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर आज, मंगळवारी दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार होता. मात्र साई रिसॉर्टच्या मालकाने कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे.
(हेही वाचा – SBI बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल ६३००० पर्यंत पगार, असा करा अर्ज!)
काय म्हणाले परब
या साई रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम हे आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रात त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहे. सदानंद कदम हे माझे मित्र आहेत. या रिसॉर्टच्या बाबतीत कोर्टाचे जैसे थे असे आदेश आहेत. या आदेशाअंतर्गत कोर्टाने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे.
Join Our WhatsApp Community