शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुरुड येथील रिसॉर्टवरप्रकरणी अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी केंद्राची समिती अनिल परब यांच्या रिसॉर्टवर गुरुवार, १४ जुलै रोजी पोहचली.
५ सदस्यांचे पथक मुरुडमध्ये दाखल
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यामुळे शिवसेना नेते अनिल परब यांची चौकशी होत आहे. या चौकशीसाठी ५ सदस्यांचे पथक मुरुडमध्ये दाखल झाले आहे. त्यात पर्यावरण विभाग आणि अन्य विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. हे पथक साई रिसॉर्टची पाहणी करणार आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे साई रिसॉर्ट बेकायदेशीर आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे. किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडेही या रिसॉर्टच्या विरोधात तक्रार केली आहे. याआधीही पर्यावरण विभागाचे पथक या रिसॉर्टची पाहणी करून गेले आहे. मात्र महाविकास आघाडी कोसळल्यानंतर पुन्हा हे पथक पाहणी करण्यासाठी आले आहे. दिवसभर या पथकातील अधिकारी या रिसॉर्टची चौकशी करत होते. या प्रकरणी नेमकी कारवाई काय होईल, हे पाहावे लागेल. हे पथक नेमका काय अहवाल सादर करते हे पाहावे लागेल.
(हेही वाचा नगराध्यक्ष, सरपंचाची निवड जनतेमधूनच होणार! )
Join Our WhatsApp Community