“माफी मागावीच लागेल अन्यथा…”, दापोलीच्या रिसॉर्टबाबत भाष्य करून परबांचा सोमय्यांना इशारा

अनिल परब यांच्या दापोलीमधील साई रिसॉर्टसंदर्भात स्वतः त्यांनी नव्याने वक्तव्य केले आहे. किरीट सोमय्या वारंवार माझी आणि उद्धव ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, असे परब म्हणाले तर हा आरोप करताना परब सोमय्यांना इशारा देत म्हणाले की, याप्रकरणी सोमय्यांना माफी मागावीच लागेल किंवा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.

(हेही वाचा – RSS प्रमुखांनी घेतली मुस्लिम संघटनेच्या नेत्यांची भेट, बंद खोलीत तासभर चर्चा)

काय म्हणाले परब

दापोलीच्या रिसॉर्टसंदर्भात मी वारंवार सांगितले आहे. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. याबाबत ईडीकडून आणि स्थानिक प्राधिकरणाकडून चौकशी झाली आहे. स्थानिक प्राधिकरण आणि न्यायालयाच्या आदेशाला आम्ही बंधनकारक आहोत. किरीट सोमय्या म्हणाले याला आम्ही बांधील नाही. ज्या यंत्रणांना अधिकार आहे, किंवा त्या यंत्रणा जे आदेश देतील त्याचे आम्ही पालन करू, असे अनिल परब म्हणाले.

परबांनी दिला सोमय्यांना इशारा

अनिल परब पुढे म्हणाले, ज्यांचा या रिसॉर्टशी संबंध आहे, ते पाहतील यांचं काय करायचं. सदानंद कदम यांनी ते रिसॉर्ट आपल्या मालकीचे असल्याचा खुलासा केला असून त्यांचं सातबाऱ्यावर नाव देखील आहे. पण सोमय्या वारंवार माझी बदनामी करत आहे. त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी या प्रकरणात एकतर माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशा इशाराही सोमय्यांनी त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here