अनिल परब यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून सहा तास चौकशी

सलग तिसऱ्या दिवशी परिवहनमंत्री अनिल परब यांची ईडीने सहा तास चौकशी केली. अनिल परब यांनी दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणातील काही कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केली असल्याची माहिती समोर येत आहे. परब यांना पुन्हा २४ जून शुक्रवारी ईडी कार्यालयात बोलवले आहे का याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण; ड्युटी शेड्युल बदलण्याची मागणी पूर्ण)

ईडीकडून सहा तास चौकशी

परिवहनमंत्री अनिल परब हे सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात चौकशीसाठी दुपारी ४ वाजता हजर राहिले होते, तब्बल सहा तास चौकशी तसेच संबंधित कागदपत्रे ईडीने परब यांच्याकडून ताब्यात घेऊन रात्री ९ वाजता त्यांना सोडले. परब यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच माध्यमांशी काहीही संवाद न साधता त्यांच्या सरकारी वाहनातून ते निघून गेले. साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात सलग तिसऱ्या दिवशी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र त्यांना शुक्रवारी पुन्हा बोलावले आहे का याबाबत कोणतीही माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप दिलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here