माजी परिवहन मंत्री आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि केबल व्यावसायिक सदानंद कदम यांना सक्तवसूली संचालनालयाने दापोलीतील साई रिसाॅर्ट प्रकरणी समन्स बजावले आहेत.
दापोलीमध्ये जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये 1 कोटी 10 लाखांना जमीन खरेदी करण्यात आली होती. पुढे त्या ठिकाणी रिसाॅर्ट बांधण्यात आले. रिसाॅर्ट बांधताना केंदाने आखून दिलेल्या सीआरझेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, शासनाचीही फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मनी लाॅंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे.
( हेही वाचा: माझ्याभोवती हुजरेगिरी करणारे पदाधिकारी नकोत! राज ठाकरेंचा नेत्यांना इशारा )
पुढील आठवड्यात हजर राहण्याचे आदेश
ईडीने या प्रकरणात याआधीही अनिल परब आणि सदानंद कदम यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदानंद कदम यांना समन्स बजावून पुढील आठवड्यात ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community