NCP च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती

51
NCP च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी दोन वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शनिवारी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांना ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ पदाची जबाबदारी सोपवली आहे. (NCP)

या नियुक्तीनंतर पक्षाच्या अधिकृत घोषणेनुसार, अनिल भाईदास पाटील यांच्यावर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर लहू कानडे यांना पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (NCP)

(हेही वाचा – कोस्टल रोड प्रकल्पात कच्चा माल पुरवणारे ठेकेदार कोण?; अमेय घोले यांनी Shiv Sena UBT ला केला सवाल)

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या दोन्ही नियुक्त्या पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि राज्यभरात पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी अनिल पाटील आणि लहू कानडे यांच्याकडून पक्षवाढीच्या दृष्टीने प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. (NCP)

पक्षाच्या धोरणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीला चालना देण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या नेत्यांना केले आहे. त्याचबरोबर, या नवीन जबाबदाऱ्यांसाठी दोघांनाही शुभेच्छा देत पक्षाच्या यशासाठी त्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.