बदनामीकारक मजकूर सोशल मिडियावर शेअर केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटिस बजावली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचे छायाचित्र सोशल मिडियावर शेअर करून ‘या माणसाने देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही’, असा मजकूरही प्रसारित केला आहे. यावर अण्णा हजारे यांनी त्यांचे कायदेशीर सल्लागार अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत आव्हाड यांना कायदेशीर नोटिस बजावली आहे.
(हेही वाचा – Israeli–Palestinian Conflict : तेल अवीवला जाणारी एअर इंडियाची सर्व विमान उड्डाणे रद्द!)
जितेंद्र आव्हाड हे जबाबदार राजकीय नेते आहेत. त्यांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून हजारे यांची बदनामी केली आहे. हजारे यांच्या नावाचा वापर करुन आव्हाड राजकीय प्रसिद्धी मिळवत आहेत. आव्हाड यांच्याविरुद्ध १० ते १५ फौजदारी खटले आहेत. आव्हाड बदनामीकारक मजकूर प्रसारित करून समाजात वाद निर्माण करतात. बेजबाबदार राजकीय व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज वाटल्याने आव्हाड यांना नोटीस पाठविण्यात आलेली आहे, असे हजारे यांच्या वतीने ॲड. पवार यांनी दिलेल्या नोटिशीत नमूद केले आहे, तर आव्हाड यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध मानहानी, बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाचे दावे दाखल करण्यात येतील, असे ॲड. पवार यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community