अण्णा हजारेंचे धक्कादायक वक्तव्य! स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही आलीच नाही…

104

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही मंडळींनी लोकशाही कधीच येऊ दिली नाही. मात्र राज्यातील संघटित कृतीमुळे ती लोकशाही किमान महाराष्ट्र राज्यात तरी येऊ शकेल, असा विश्वास निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : कोणत्या ५४ चिनी अ‍ॅप्सवर भारत सरकारने घातली बंदी? जाणून घ्या..)

आमची संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती

सुपर मार्केटमधून वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात पुकारलेले उपोषण अण्णांनी रविवारी स्थगित केल्याची घोषणा करत सरकारला ९० दिवसांची मुदत दिली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णांनी काढलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, २७ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाने वाइन विक्री संदर्भातील जो निर्णय घेतला होता तो समाजावर दुष्परिणाम करणारा होता. आमची संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती आहे. त्या संस्कृतीचे रक्षण आणि जतन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती, सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या निर्णयाला विरोध करून सरकारला जाणीव करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्याचप्रमाणे समाजामध्ये अज्ञानाच्या पोटी किंवा जाऊ द्या, मला काय करायचे अशा संकुचित वृत्तीने जीवन जगणाऱ्या काही लोकांना जागविण्याचे कार्य केले. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, संस्था, संघटना, व्यक्ती आणि बंधू भगिनींना धन्यवाद देतो. असे या निवेदनात स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या एका आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची केली बदली? काय आहे कारण… )

८४ वर्षांच्या वयामध्ये जनसेवेची नवीन उर्जा मिळाली

तुमच्या या कृतीमुळे ८४ वर्षांच्या वयामध्ये मला जनसेवेची नवीन उर्जा मिळाली आहे. नवीन पाठबळ मिळाले आहे. आता विश्वास निर्माण झाला आहे. ज्या लोकशाहीसाठी १८५७ ते १९४७ असे ९० वर्षे लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. पण स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांपर्यंत लोकसहभागातून चालविलेली लोकशाही काही लोकांनी येऊ दिली नाही. आता मात्र राज्यातील तुमच्या संघटित कृतीमुळे ती लोकशाही किमान महाराष्ट्र राज्यात तरी येऊ शकेल, असा विश्वास निर्माण झाला. आपण प्रतिज्ञा करू या आणि आपल्या लोकशाहीसाठी ज्यांनी बलिदान केले, त्यांच्या आत्म्यांना सांगूया की, आम्ही तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यासाठी भलेही आम्हाला पुन्हा बलिदान करावे लागले तरी आम्ही हसत हसत बलिदान करू असे अण्णा हजारे म्हणाले. पुढील काळात सर्व कार्यकर्ते संस्था, संघटना आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या सर्व व्यक्ती आपण संघटीतपणे प्रयत्न करू या, असे आवाहनही अण्णा हजारे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.