काँग्रेस पक्ष नेतृत्वाविषयी नाराज असलेले गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर अखेर त्यांनी स्वतःच्या नव्या पक्षाची स्थापना केली. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई या सर्वांचा हा पक्ष असणार आहे, असे गुलाब नबी आझाद म्हणाले. माझ्या पार्टीचे नावच काय, झेंडाही जम्मू-काश्मीरचे लोकच ठरवतील, असे गुलाब नबी आझाद म्हणाले.
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करणे हा पक्षाचा अजेंडा
माझ्या पक्षाचे नाव काय असावे यासंबंधी माझ्याकडे बरीच नावे आली आहेत. त्यातील काही नावे उर्दू आहेत. तर काही संस्कृत आहेत. पण माझ्या पक्षाचे नाव हिंदुस्तानी असेल. हा पक्ष सर्वांचाच असेल, असे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. लोकांना त्याच्या जमिनी मिळाव्यात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळावा. तसेच काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन व्हावे हा माझा अजेंडा आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्या बंद झाल्या पाहिजे. जम्मू-काश्मिरातही पर्यटन स्थळ आहे. तिथपर्यंत रस्ते बनविण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा Cyrus Mistry Death : टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू)
Join Our WhatsApp Community