मालमत्ता करमाफीची घोषणा लबाडा घरचं आवताण! अतुल भातखळकरांची टीका

114

मुख्यमंत्र्यांनी केलेली 500 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांच्या मालमत्ता करमाफीची घोषणा म्हणजे लबाडा घरचं आवताण असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली.

वचननाम्याची आठवण करून देण्यास दोन वर्षे का लागली?

मुख्यमंत्र्यांनी मालमत्ता कर माफीची घोषणा ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मुंबईतील भाजपा आमदार यांनी यासंदर्भात विधानसभेत आवाज उठविल्यानंतर केली, याकडे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्ष वेधले. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला त्यांच्या वचननाम्याची आठवण करून देत हा निर्णय घेण्यास दोन वर्षे का लागली, असा सवालही उपस्थित केला. मुंबईकरांना मोफत लस देण्याचे आश्वासन, तसेच वादळामुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मुंबईकरांना कोणतीही आर्थिक मदत नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलेली कोणतीही आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण न करता केवळ ट्विटरवरून आश्वासनांची घोषणा करण्याचे काम युवराजांनी केले असल्याचे ही त्यांनी यावेळी म्हटले.

(हेही वाचा राज्यात पुन्हा लागणार का लॉकडाऊन? काय म्हणतात आरोग्यमंत्री?)

भाजपाच्या दणक्यानंतर निर्णय

भाजपाच्या दणक्यानंतर शिवसेनेला निर्णय घेण्याची आठवण झाली, असे आमदार भातखळकर यांनी यावेळी सांगितले. जोपर्यंत मुंबईतील ५०० चौ. फुटापर्यंतच्या सदनिकांच्या मालमत्ता कराची बिल शून्य होत नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी या विरोधात सतत आवाज उठवत राहील, असा इशाराही आमदार भातखळकर यांनी यावेळी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.