AAP चे एकामागोमाग एक नेते गजाआड जात आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आवाज असल्याचे सांगत राजकारणात आलेल्या या पक्षातील आजवरचे सर्वाधिक नेते भ्रष्टाचाराच्याच आरोपाखाली कारागृहात गेले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता वक्फ बोर्डाच्या घोटाळ्याप्रकरणी AAP चे आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांना ED ने अटक केली.
(हेही वाचा काँग्रेसच्या निवडणूक घोटाळ्याचे पहिले बळी ठरले होते Dr. Babasaheb Ambedkar)
अटकेपूर्वी ED च्या पथकाने अमानतुल्ला यांची सुमारे साडेनऊ तास चौकशी केली. आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर वक्फ बोर्डात 32 जणांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करणे, बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने देणे आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी ते ईडीसमोर हजर झाले होते. तसेच, त्यांची सकाळपासून चौकशी सुरू होती. चौकशीनंतर ईडीने त्याला अटक केली. दरम्यान, अमानतुल्ला यांच्या अटकेची बातमी मिळताच AAP नेते संजय सिंह आणि मंत्री आतिशी अमानतुल्ला खान त्यांच्या घरी पोहोचले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सप्टेंबर 2022 मध्ये अमानतुल्ला यांची चौकशी केली होती. या आधारे एसीबीने चार ठिकाणी छापे टाकून सुमारे 24 लाखांची रोकड जप्त केली होती. याशिवाय दोन बेकायदेशीर व विना परवाना पिस्तूल, काडतुसे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community