Shivsena UBT मधील आणखी एक मोठा नेता नाराज? कोकणात पुन्हा सुरु झाल्या हालचाली

नुकतेच शिवसेना उबाठाचे नेते राजन साळवी शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

138
Uddhav Thackeray यांना मोठा धक्का? ६ खासदार शिवसेनेच्या वाटेवर!

कोकणात माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उबाठाला (Shivsena UBT) जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना उबाठामधील आजी आमदारही पक्षात येणार असल्याचे शिवसेना नेते, मंत्री सुहास सामंत यांनी म्हटले. त्यामुळे चर्चेला उधाण आले असताना कोकणातील शिवसेना उबाठाचे (Shivsena UBT) एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी उघडपणे नाराजी जाहीर केली. त्यामुळे कोकणात पुन्हा हालचालींना सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा आघाडीत होणार बिघाडी! उद्धव ठाकरेंना Congress देणार मोठा झटका?)

काय म्हणाले भास्कर जाधव? 

माझी राजकारणातील सुरुवात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मला भाषणे करायची संधी मिळाली. त्यावेळीच्या शिबिरांत मला भाषणे करण्याची संधी मिळायची. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की या पोराला महाराष्ट्रात फिरवा, याला महाराष्ट्रात फिरवला तर ग्रामीण भागातील, तळागाळातील माणूस आपल्याला जोडला जाईल. शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद लाभले. त्यानंतर पवारांचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटे बोललेले मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावते. पण माझे दुर्दैव मला सतत आडवे आले आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. (Shivsena UBT)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.