- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर महायुतीला (Mahayuti) पहिला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत स्वबळाचा नारा दिला. यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडत आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर केलंय. शिवसंग्रामच्या ज्योती विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
(हेही वाचा – Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ)
दिवंगत नेते विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष मराठवाड्यात बऱ्यापैकी प्राबल्य घेऊन आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना विनायक मेटे यांचे शिष्य मानले जाणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून त्यांची चाचपणी करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. महायुतीकडून (Mahayuti) योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे यांनी आपले प्राबल्य असलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पाच उमेदवार स्वतंत्र उभे करण्याचा मानस ठेवला आहे.
(हेही वाचा – Love Jihad : आशिक अन्सारीने केले हिंदू तरुणीचे अपहरण आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती)
बीड जिल्ह्याबाहेर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील मराठा उमेदवार उभे करून आपली स्वतंत्र भूमिका मांडण्याचा शिवसंग्रामच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. घटक पक्षांना सोबत घेऊन कोणत्याही प्रकारचे महत्त्व न देता उमेदवार देखील न देण्याची भूमिका ही शिवसंग्राम पक्षाला पटलेली नाही. त्याचा फटका महायुतीला (Mahayuti) होतो की महाविकास आघाडीला तो येणारा काळच ठरवणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community