छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी (17 जाने.) नलक्षवाद्यांनी (Chhattisgarh Naxalites) घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात (IED blast) सीमा सुरक्षा दलाचे (BSF) दोन जवान जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आज (17 जाने.) सकाळी गरपा गावाजवळ बीएसएफ पथक गस्त घालत असताना ही घटना घडली. गरपा कॅम्प आणि गरपा गावादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. (Chhattisgarh Naxalites)
Chhattisgarh | 2 BSF jawans are injured in an IED blast by Naxalites carried out an IED blast on the BSF ROP party while the ROP party was being set up between Camp Garpa and Garpa village. Detailed information will be given separately: Narayanpur SP Prabhat Kumar
— ANI (@ANI) January 17, 2025
या स्फोटात दोन बीएसएफ जवान जखमी झाले आहेत, असे नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी गुरुवारी (16 जाने.) शेजारील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते. (Chhattisgarh Naxalites)
हेही वाचा-Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू
१२ जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यातील एका घटनेत १० वर्षांची एक मुलगी जखमी झाली. तर विजापूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या आयईडी स्फोटात दोन पोलिस जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा भागात झालेल्या अशाच दोन वेगवेगळ्या घटनांत एका गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते. (Chhattisgarh Naxalites)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community