Hardeep Singh Nijjar च्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक

कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारतातील वॉन्टेड दहशतवाद्यांच्या 40 नावांच्या यादीत निज्जरचा समावेश होता.

151

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी चौथ्या भारतीयाला अटक केली आहे. हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीवर यापूर्वीच शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा नव्याने आरोप ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी, ११ मे रोजी सांगितले. याआधी कॅनडाच्या पोलिसांनी आणखी तीन भारतीयांनाही अटक केली होती.

(हेही वाचा TMC ने पश्चिम बंगालमध्ये घोटाळ्यांचे अड्डे बनवले; PM Narendra Modi यांचा घणाघात)

यापूर्वीच करण ब्रार, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग यांना अटक 

कॅनेडियन पोलिसांचे तपास पथक, इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) ने सांगितले की त्यांनी अमनदीप सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याच्यावर फर्स्ट-डिग्री खून आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी यापूर्वीच करण ब्रार, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग यांना अटक केली आहे. आयएचआयटीने सांगितले की, ब्रॅम्प्टन, सरे आणि ॲबॉट्सफोर्ड येथे राहणारा 22 वर्षीय भारतीय व्यक्ती अमनदीप सिंग आधीच ओंटारियोमध्ये पोलिसांच्या ताब्यात होता. आता त्याच्यावर निज्जरच्या हत्येच्या कटाला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तसेच अन्य तीन आरोपींप्रमाणेच अमनदीपवरही फर्स्ट डिग्री हत्येचे गंभीर आरोप आहेत. कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारतातील वॉन्टेड दहशतवाद्यांच्या 40 नावांच्या यादीत निज्जरचा समावेश होता. ज्याच्या आधारे कॅनडाच्या सरकारने भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.